Labh Drishti Yog on 12 September: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून इतर ग्रहांसोबत शुभ योग तयार करतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि जगावर दिसतो. १२ सप्टेंबरला त्रिएकादश योग तयार होतोय, ज्याला लाभ दृष्टी म्हणतात. हा योग तेव्हा तयार होतो, जेव्हा दोन ग्रह ६० अंशाच्या कोनावर असतात.
यावेळी सूर्य आणि गुरु हे ग्रह एकमेकांपासून ६०° अंतरावर राहतील आणि त्यामुळे त्रिएकादश योग बनेल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. धन- संपत्तीत मोठी वाढ होऊ शकते आणि मुलांबाबत शुभ बातमी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहेत.
धनु राशी (Sagittarius Zodiac Sign)
तुमच्यासाठी लाभ दृष्टी योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत सुधारेल. व्यापाऱ्यांना हुशारीने घेतलेल्या निर्णयांमुळे फायदा होईल. विवाहित लोकांचे संबंध गोड राहतील आणि नात्यांमध्ये आपुलकी वाढेल. याचबरोबर या काळात तुम्हाला मान-सन्मान मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच तुम्ही पैशाची बचत करण्यातही यशस्वी व्हाल.
सिंह राशी (Leo Zodiac Sign)
लाभ दृष्टी योगामुळे सिंह राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. पैशाचे नवे मार्ग सापडतील. व्यापारी वर्गाला आर्थिक समृद्धी जाणवेल. नोकरी करणाऱ्यांना समाजात उच्च स्थान मिळवण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या निर्णयांवर समाधानी राहाल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मेहनत कराल. कुटुंबात गोडवा येईल आणि मन आनंदी राहील. अविवाहितांना विवाहाची संधी मिळू शकते. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी (Gemini Zodiac Sign)
तुमच्यासाठी त्रिएकादश योग सकारात्मक ठरू शकतो. या काळात कामधंद्यात चांगली प्रगती होईल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. हळूहळू आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)