Triple Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला नऊ ग्रहांचा राजा मानले जाते. पिता आणि आत्म्याचा कारक सूर्य दर महिन्याने राशी बदल करतो, ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या राशीत ग्रहांचा संयोग होतो. १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत प्रवेश करताच सूर्य त्रिग्रही राजयोग निर्माण करेल, तर गुरु आणि बुध आधीच मिथुन राशीत स्थित आहेत. अशाने तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही, बुधादित्य आणि गुरु आदित्य योग निर्माण होत आहे. या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. पण, कोणत्या राशींना हे फायदे मिळणार जाणून घेऊ….
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १५ जून रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल आणि १६ जुलैपर्यंत तिथेच असेल, ज्यामुळे गुरु आदित्य योग १६ जुलैपर्यंत राहील. असा योग १२ वर्षांनी घडत आहे. यासह मिथुन राशीत २२ जूनपर्यंत बुधादित्य योग असेल, कारण यानंतर ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत प्रवेश करेल.
मिथुन (Gemini)
मिथुन राशींच्या लोकांना त्रिग्रही, बुधादित्य आणि गुरु आदित्य राजयोग फलदायी ठरू शकतात. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. जीवनात सुरू असलेल्या अनेक समस्या संपू शकतात. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. नवीन नोकऱ्यांच्या अनेक संधी मिळू शकतात. नेतृत्व क्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते आणि ती तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. यासह पगार वाढण्याची शक्यतादेखील आहे. स्पर्धात्मक किंवा इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तुमच्या मुलाकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकते. तुमच्या जोडीदारासह तुमचा वेळ चांगला जाईल. आरोग्याबाबत थोडे सावधगिरी बाळगा.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही, बुधादित्य आणि गुरु आदित्य राजयोग शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत प्रचंड यश मिळू शकते. सन्मान आणि आदर वाढू शकतो. लग्न जुळवण्यात येत असलेल्या अडचणी आता संपू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. यासह समाजात मान आणि सन्मान वाढू शकतो. लव्ह लाईफमध्ये चांगले क्षण येतील. व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळू शकतो. भाऊ-बहिणींसह चांगला वेळ घालवता येईल, यामुळे जीवनात आनंदही येऊ शकतो.
तुळ (Libra)
तुळ राशीच्या लोकांसाठी त्रिगुण राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशींच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कोणत्याही कामात वडिलांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. अध्यात्माकडे कल असेल. कामातील अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.