20th February Horoscope Marathi: आज २० फेब्रुवारी, एकादशी : मंगळवार पंचांग, काही राशींकडून विनाकारण खर्च होऊ शकतो. तर काहींनी प्रवासात काळजी घ्यावी. आज कुणावर राहील गणपती बाप्पाची कृपादृष्टी जाणून घ्या.

मेष:-कामे यथायोग्य पार पडतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी येणी वसूल होतील. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

वृषभ:-जोडीदाराचे वर्चस्व राहील. किरकोळ मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. अति विचार करणे टाळावे. उगाचच दुराग्रह करू नका.

मिथुन:-वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. मनातील गैरसमज दूर करावेत. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

कर्क:-कामाची धांदल राहील. घाईने कोणत्याही गोष्टी उरकू नका. मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराची कमाई वाढेल.

सिंह:-कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. जमिनीची कामे तूर्तास करू नयेत. तब्येतीत काहीसा फरक पडेल. क्षुल्लक कारणावरून दुरावा वाढवू नका. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.

कन्या:-प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत विरोधी वाटू शकते. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

हेही वाचा : बुध गोचरमुळे निर्माण होईल शश आणि बुधादित्य राजयोग; ‘या’ राशींसाठी सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अमाप पैसा

तूळ:-बोलतांना भान राखावे. अनावश्यक खर्च वाढेल. प्रवासात काहीसा त्रास जाणवेल. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे.

वृश्चिक:-क्रोधावर नियंत्रण ठेवावे. पित्त-विकार बळावू शकतात. किरकोळ अडचणीतून मार्ग काढा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या धाडसात वाढ होईल.

धनू:-जुगाराची हौस पूर्ण करता येईल. जबाबदारीची जाणीव लक्षात ठेवावी. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामाजिक वादात अडकू नका. सामाजिक बांधीलकी जपावी.

मकर:-कामातील दिरंगाई टाळावी. खर्चाचा पुनर्विचार करावा. अडथळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. बोलण्यात लाघवीपणा ठेवाल.

कुंभ:-सर्वांशी हसून खेळून वागाल. दिवस आळसात घालवाल. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. झोपेची तक्रार जाणवेल.

मीन:-अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. बढतीसाठी प्रयत्न करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कुटुंबात कर्तेपणाचा मान राहील. मुलांवरील खर्च वाढेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर