Vastu Tips For Home: अनेक पुराणांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगितलेले आहे, केवळ धार्मिकच नव्हे तर आरोग्यासाठी सुद्धा दारातील तुळस गुणकारी आहे. मूळ, खोड, पाने यासह त्याचे सर्व भाग उपयुक्त आहेत. तुळशीच्या रोपामुळे घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता येते असे मानतात. यामुळेच प्रत्येक दारासामोर तुळस लावण्याचा सल्ला दिला जातो, त्यानुसार अनेक गृहिणी तुळशीचे रोप लावतात पण काही केल्या हे रोप तग धरत नाहीत. पुरेसा सूर्यप्रकाश व पाणी देऊनही तुळस वाढत नाही किंवा लवकर सुकून जाते असा अनुभव तुम्हालाही आला आहे का? तर कदाचित तुमची निवड व तुळशीचे रोप लावण्याची पद्धत चुकत असेल.

शेती तज्ज्ञ व पौराणिक अभ्यासकांच्या माहितीनुसार, तुळशीचे दोन प्रकार आहेत. रामा तुळस व श्यामा तुळस असे हे प्रकार अत्यंत शुभ मानले जातात मात्र यातील कोणती तुळस तुम्ही निवडता यावर ती तुळस तुमच्या दारात टिकणार का हे अवलंबून असते. रामा व श्यामा तुळशीचं रोप ओळ्खताना पानांचा रंग व आकार यानुसार स्पष्ट फरक दिसतात.

हिंदू पुराणानुसार श्रीकृष्णाला प्रिय असल्याने या तुळशीला श्यामा असे नाव देण्यात आले. श्यामा तुळशीची पाने गडद हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची असतात व चवीला तुलनेने गोडसर असतात. तर रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा किंवा पोपटी असतो. तुम्हालाही नावावरून अंदाज आलाच असेल की रामा तुळस ही प्रभू श्रीरामाला प्रिय असल्याचे मानले जाते. या तुळशीची पाने गोड असतात.

तुळशीच्या लागवडीचे शुभ मुहूर्त व नियम

रामा व श्यामा तुळशीतील मुख्य फरक म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेत तुळशीची जी हजार पाने अर्पण केली जातात ती रामा तुळशीचीच असतात, यामुळे घरी लागवड करताना रामा तुळशीला प्राधान्य दिले जाते.

रामा तुळस ही वृंदावनात म्हणजेच एखाद्या कुंडीतही उत्तम वाढते तर श्यामा तुळशीच्या वाढीसाठी गावासारखी मोकळी जागा हवी असते थेट जमिनीत लागवड केल्यास श्यामा तुळशीची वाढ होते. त्यामुळे तुम्ही लागवडीसाठी तुळस घेत असल्यास हिरव्या पानाची रामा तुळशी निवडावी असा सल्ला दिला जातो.

Tulsi Plantation: तुळशीची शेती, कमी गुंतवणूकीत लाखोंची कमाई! तुम्हीही करू शकता गुंतवणूक, वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे तुळशीची लागवड भगवान विष्णू व लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या दिवशी म्हणजेच गुरुवार,शुक्रवार , शनिवार अशा दिवशी केल्यास वाढ उत्तम होतेच तसेच लक्ष्मीमातेचा आशीर्वाद लाभतो. एकादशी व ग्रहांच्या दिवशी तसेच रविवारी तुळशीची लागवड करू नये असेही सांगितले जाते.