अनेक पुराणांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगितलेले आहे, केवळ धार्मिकच नव्हे तर आरोग्यासाठी सुद्धा दारातील तुळस गुणकारी आहे. मूळ, खोड, पाने यासह त्याचे सर्व भाग उपयुक्त आहेत. यामुळेच या रोपाची सतत मागणी वाढत आहे. विशेषतः कोरोनाच्या आजारानंतर आयुर्वेदिक औषधांकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. अगदी च्यवनप्राश ते घरातील धूप अगरबत्ती इतकंच नव्हे तर साबणात सुद्धा तुळशीच्या अर्काला विशेष मागणी आहे. अर्थात या साऱ्यामुळे तुळशीची शेती ही नफ्याचे स्रोत ठरत आहे. मात्र या नगदी पिकाबाबत अनेक शेतकऱ्यांना फार माहिती नाही. सद्य घडीला तुळशीचा वापर जास्त आणि पुरवठा कमी असल्याने आपणही या तुळस शेतीचा विचार करू शकता. याबाबत काही तपशील आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत..

तुळशीची लागवड खूप सोपी आहे. वैयक्तिक स्तरावर शेती करण्यापेक्षा तुळशीची उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीशी करार करून आपण लागवड करणे जास्त फायद्याचे ठरेल.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
Use Apps to Manage Electricity Use and Reduce Bills During Summer Heatwaves
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज…
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
Kitchen Jugaad how to use lemon to Clean gas
Kitchen Jugaad: गॅसवर लिंबू टाकताच होईल कमाल, पाहा भन्नाट किचन जुगाड व्हिडीओ

Farming Hacks: एका लागवडीत 50 वर्ष उत्पादन देणारा बदाम, महाराष्ट्रातही विकसित होत आहेत ‘या’ प्रजाती

तुळशीचा लागवड खर्च प्रति एकर 15 हजार रुपये आहे. तर सरासरी महिन्याला किमान 30 हजार ते लाख रुपयांपर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत 3 लाख रुपये इतकी मिळकत तुळशीच्या लागवडीतून शक्य आहे. आज वैद्यनाथ, डाबर, पतंजली या कंपन्या तुळशीच्या लागवडीसाठी बाजारात करार करीत आहेत.

कंत्राटी शेतीशिवाय तुम्ही तुमचे पीक मार्केट एजंटांनाही विकू शकता. जवळपासच्या बाजारात आपला माल विकण्यासाठी तुम्ही विविध व्यापाऱ्याशी संपर्क साधू शकता. तसेच, कॉन्ट्रॅक्ट शेती करणे हा एक चांगला पर्याय अलीकडे विकसित झाला आहे.

तुळशीची लागवड साधारण जुलै महिन्यापासून करणे फायद्याचे ठरते. साधारण 45 x 45 सेमी अंतरावर रोपे लावावीत. रोपे लावल्यानंतर ताबडतोब हलके सिंचन करावे व नंतर आठवड्यातून एकदा किंवा गरजेनुसार पाणी द्यावे लागेल. कापणीच्या 10 दिवस पूर्वी सिंचन बंद करावे. साधारण 15 ते 20 मीटर उंचीची रोपे झाल्यास कापणी करावी.

जेव्हा रोपांवर फुले येण्यास सुरूवात होते त्याचवेळेस कापणी केल्यास रोपांना नवीन फांद्या येतील आणि जास्त तेल काढता येईल. तुळशीचे तेल रोगप्रतिकार क्षमता वाढते शिवाय विषाणूंशी निगडित रोगांशी लढण्यासदेखील मदत करते. यामुळे सध्या बाजारात तुळशीच्या तेलाची मागणी केली आहे.