२०२२ मध्ये एकूण ४ ग्रहण होतील. ज्यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असणार आहेत. लवकरच वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रहणांमध्ये फक्त १५ दिवसांचा फरक असेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी रात्री होईल, त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजे १६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण होईल. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. ग्रहण कोणत्या ३ राशींसाठी शुभ सिद्ध होईल जाणून घेऊया.

मेष (Aries) : या राशीच्या लोकांसाठी ग्रहण शुभ असेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. तुम्हाला कोणत्याही कामात मोठे यश मिळू शकते.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

सिंह (Leo) : या राशीच्या लोकांवर ग्रहणाचा शुभ प्रभाव राहील. आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे सहकारी खूश होतील. प्रत्येक कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत चांगली बढती मिळण्याची आशा आहे. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. प्रवासातूनही तुम्हाला चांगले लाभ मिळतील.

आणखी वाचा : “कृपया मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर…”, ‘शेर शिवराज’ प्रदर्शित होताच चिन्मय मांडलेकरने केली विनंती

धनु (Sagittarius) : दोन्ही ग्रहणांचा तुमच्यावर चांगला प्रभाव पडेल. आर्थिक जीवनात यश मिळेल. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक कामात घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. आरोग्यही चांगले राहील. या काळात केलेले प्रवास तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम देतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)