Vaibhav Suryavanshi Kundli : भारतात क्रिकेट हा खेळ विशेष लोकप्रिय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना क्रिकेट खेळायला आणि पाहायला आवडते. सध्या देशात आयपीएल सुरू आहे. आयपीएल हा एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. आयपीएलमध्ये फक्त भारतातीलच नाही तर जगातील अनेक नामवंत खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते.
सध्या एका नावाने आयपीएलमुळे धुमाळून घातला आहे. आयपीएलचा उत्साह शिगेला पोहचला असताना फक्त १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बिहारच्या या तरुण फलंदाजाने फक्त ३५ चेंडूमध्ये शतक झळकावले आणि आयपीएलमध्येच नव्हे तर टी-२० क्रिकेटमध्येही सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावी केला आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या वैभव सूर्यवंशीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. जाणून घेऊ या वैभव सूर्यवंशीची कुंडली.

वैभव सूर्यवंशीच्या कुंडलीमध्ये निर्माण होणाऱ्या मूलांक व नक्षत्र संयोगाविषयी जाणून घेऊ या.

वैभव सूर्यवंशीची कुंडली

क्रिकेटर वैभव सूर्यवंशीचा जन्म बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपूर येथे झाला. वैभवचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला. त्याची रास मीन असून त्याचा पूर्वाषाढा नक्षत्रात जन्म झाला आहे. वैभवने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेटमध्ये एंट्री केली आणि वयाच्या १४ व्या वर्षी इतिहास रचला.

ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्वाषाढा नक्षत्राला अजय किंवा जिंकणारा म्हणतात. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये एक अचंबित करणारी क्षमता असते. हे लोक कधीही हार मानत नाही. ज्योतिषशास्रानुसार, या वेशी सूर्यवंशीच्या कुंडलीमध्ये गुरूचा विशेष प्रभाव दिसून येत आहे, ज्यामुळे येत्या काळात तो चांगला नाम कमावणार व यश मिळवणार

नक्षत्र मूलांक

अंकशास्त्रानुसार, वैभवचा मूलांक ९ आहे. मूलांक ९ चा संबंध मंगळ ग्रहाशी असतो. या मूलांकच्या लोकांवर मंगळ ग्रहाची विशेष कृपा असते. मंगळ ग्रहाच्या कृपेने या मूलांकचे लोक धाडसी, पराक्रमी आणि ऊर्जावान असतात. वैभवचा भाग्यांक ७ आहे ज्यावर केतु ग्रहाचे वर्चस्व आहे. केतुच्या प्रभावाने या भाग्यांकचे लोक अत्यंत गंभीर स्वभावाचे आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवणारे असतात. ज्या लोकांना केतु ग्रहाची कृपा प्राप्त होते ते नेहमी यशस्वी होतात.