Dainik Rashi Bhavishya In Marathi 4 september 2025 : आज ४ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज उत्तरषाढा नक्षत्र जागृत असेल आणि सौभाग्य योग जुळून येणार आहे. आज राहू काळ ३ वाजून वाजता सुरु होईल ते १ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन द्वादशी किंवा वामन जयंती म्हणतात. श्रीमद्भागवतनुसार या तिथीला श्रवण नक्षत्रामध्ये अभिजित मुहूर्तावर भगवान वामन यांचे प्राकट्य झाले होते. तर आज भगवान विष्णूंचा वामन अवतार तुमच्या राशीला कसा देणार जाणून घेऊया…
४ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 4 september 2025 )
मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटिपित मन रमून जाईल.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
लहान प्रवास घडू शकेल. हातातील कलेतून आनंद मिळेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. बोलण्यातून सर्वांना आपलेसे कराल. जवळचे मित्र बर्याच दिवसांनी भेटतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील. नवीन ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
निराश होणे टाळावे. एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मनात काहीशी चलबिचलता राहील. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अपेक्षित लाभाने आपण खुश राहाल. कामात स्त्रीवर्गाचा चांगला हातभार लागेल. बुद्धीवर्धक कामे हाताळाल. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. महत्त्वाच्या नोंदी करून ठेवाव्यात. केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल. घरातील कामात अधिक वेळ जाईल.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
आध्यात्मिक आवड पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. विशाल दृष्टीकोन ठेवून आपले मत मांडाल. तरुण वर्गाची कामात मदत मिळेल. मित्रांच्या ओळखीने काम होईल.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
अचानक धनलाभ होण्याची शक्यता. शेअर्समध्ये अपेक्षित लाभ मिळू शकेल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळवाल. कमिशनच्या कामातून आर्थिक गरज भागवली जाईल. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन:प्रत्यय येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. संपर्कातील व्यक्तींशी मैत्री वाढेल.
कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
आपल्या हातातील अधिकार लक्षात घ्यावेत. कोणतेही साहस करतांना सावध राहावे. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या कुशलतेचे कौतुक कराल.
मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल. अति भावनाशील होऊ नका. दिवस मनासारखा घालवाल. खेळकरपणे समोरील गोष्टी हाताळाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर