Vastu Shastra Tips For Home : वास्तुशास्त्रात म्हटले आहे की, अनेक वेळा एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या चुकांमुळे वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या सुख, समृद्धी व प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरात वास्तुदोष असल्यास मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. तसेच आर्थिक प्रगतीतही बाधा येचे. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते; पण वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत की, ज्यांचे पालन केल्यास वास्तुदोष निर्माण होण्याचा त्रास टळतो आणि जीवनात यशस्वी होता येते. हे नियम काय आहेत ते जाणून घेऊ….
स्वच्छ आणि नीटनेटकी ड्रॉईंग रूम
वास्तुशास्त्रानुसार, ड्रॉईंग रूम नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे. त्या ठिकाणी नेहमीच उजेड असावा. ड्रॉईंग रूममध्ये फुलदाणीत खरी फुले आणि फुलांची चित्रे ठेवणे शुभ मानले जाते. कारण- त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. फुलांची चित्रे किंवा खरी फुले पाहून मन प्रसन्न होते.
किचनमध्ये तुपाचा डबा
वास्तूनुसार, किचनमधील अग्निकोनात तूप भरलेला डबा ठेवल्याने घरात समृद्धी वाढते. तसेच आर्थिक भरभराट होते.
‘या’ रंगाची नेम प्लेट वर्ज्य
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजावर काळ्या रंगाची नेम प्लेट लावू नये. नेम प्लेटच्या वर नेहमीच लाईट असावी. असे मानले जाते की, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-समृद्धी येते.
पूर्वेला कमळाचे फूल
वास्तुनुसार, पूर्व दिशेला कमळाचे फूल ठेवणे किंवा त्याचा फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढते, असे मानले जाते.
घरातील स्वच्छ अन् वस्तुविरहीत पायऱ्या
वास्तुशास्त्रानुसार, घरातील पायऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. पायऱ्या घाणेरड्या नसाव्यात आणि त्यावर वस्तूही ठेवू नयेत. असे मानले जाते की, ज्या घरात पायऱ्या स्वच्छ असतात, तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो.