Vastu for Eating Food: जग मोठ्या झपाट्यानं बदलत चाललंय, प्रगतीच्या वाटा अधिक विस्तारत जात आहेत. त्यात अलिकडे पाश्चिमात्य संस्कृती मनामनात रूजत चालली आहे. देशात विचारस्वातंत्र्याचे वारे इतके वाहत आहेत की, भारतीय विचार आणि संस्कृती भारतीयांच्या मनातून वाहून गेली की काय? असाही कधी कधी प्रश्न पडतो. शास्त्रानुसार, आधी एकत्र कुटुंब व्यवस्था होती, ती आता कुठेतरी हरवली आहे. नवरा बायको आता एकाच ताटात सर्रासपणे जेवतात. परंतु पती-पत्नी नेहमी एकाच ताटात जेवण केल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान होते. पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. याच कारणामुळे वडिलधारी अशा गोष्टींवर आक्षेप घेताना दिसतात. काय आहे यामागील नेमकं कारण? वाचा माहिती सविस्तरपणे… नवरा-बायकोचं अनोखं प्रेम हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांना रूढी परंपरा शिकवणारेही राहिलेले नाहीत. त्यात दोघंच पती-पत्नी राहत असतील तर भांडी कमी भरावी किंवा वाढण्याचा कंटाळा येतो अशा कारणाने एकाच ताटात जेवण करतात. एका दृष्टीने तुमच्यात प्रेम वाढते असे म्हटले जाईल. पण वास्तूशास्त्रात मात्र, हे चांगलं समजलं जात नाही. काय आहे कारण.. पितामह भीष्मांनी पांडवांना सांगितले ‘हे’ रहस्य महाभारतात राजेशाही, मालमत्ता आणि कौटुंबिक समस्या अशा अनेक घटनांचा समावेश आहे. महान योद्धा आणि ज्ञानी भीष्म पितामह यांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात बाणांच्या शय्येवर पडून पांडवांना काही अत्यंत सुज्ञ शब्द सांगितले होते. या प्रवचनांमध्ये धर्म आणि अधर्म याविषयीच्या शिक्षणापासून ते यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्याच्या टिप्सही देण्यात आल्या होत्या. (हे ही वाचा : आरती, भजन, किर्तन सुरू असताना लोकं टाळ्या का वाजवतात? कोणी सुरू केली प्रथा? जाणून घ्या यामागचं रहस्य) पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह म्हणाले होते की, प्रत्येक व्यक्तीची आपल्या कुटुंबाप्रती अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये असतात. ती सर्व कर्तव्ये त्याने पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याप्रती असलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणे गरजेचे असते. पण जरा नवरा बायको एकाच ताटात जेवले तर नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम वाढतं आणि घरातल्या इतरांकडे दुर्लक्ष करू लागतात. घरात वाद होतात. त्यामुळे घराची शांतता भंग होते. म्हणूनच नवरा बायकोने एकत्र जेवण करू नये, असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भोजन करावं कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे, अशी भीष्म पितामहांची धारणा होती. यामुळे संपूर्ण कुटुंबातील परस्पर प्रेम वाढते. शिवाय एकमेकांप्रती त्याग आणि समर्पणाची भावनाही प्रबळ होते. असे कुटुंब नेहमी आनंदी असते आणि खूप प्रगती करत असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंदाने भोजन करावं. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)