आपल्या जीवनात वास्तूचे महत्त्व आहे. घर आणि कामाची जागा वास्तुनुसार बनवली नाही तर घरात विनाकारण कलह निर्माण होतो. त्याचबरोबर घरात दारिद्र्य असते, तिथून माता लक्ष्मी निघते. त्यामुळे घराची आर्थिक प्रगती खुंटते. यासोबतच घरातील सदस्यांचे आरोग्यही बिघडते. तुम्हाला वास्तुनुसार अशाच काही वास्तु टिप्स सांगणार आहोत. जे केल्याने घरात सुख-समृद्धी येऊ शकते. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल…

शूज स्टँड या दिशेला ठेवा

वास्तूनुसार शूज रॅक हे आदर्श दिशा म्हणजे पश्चिम किंवा नैऋत्य कोपर्‍यावर ठेवावे. तसेच शूज स्टँड उघडे ठेवू नये. कारण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे घरातील आर्थिक प्रगती थांबते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप ठेवा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप ठेवणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात. तसेच तुम्हाला हवे असल्यास घराभोवती केळीचे झाडही लावू शकता. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

घड्याळ या दिशेला ठेवा

वास्तूनुसार घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तरेच्या भिंतीला घड्याळ लावावे. असे केल्याने घरातील सदस्यांच्या जीवनात लवकर प्रगती होते. त्याच वेळी, प्रत्येक काम कोणत्याही अडथळ्याशिवाय होते. तर भिंतीला लावलेले घड्याळ कधीही बंद ठेवू नये.

घरी दररोज शंखध्वनी करा

सकाळ-संध्याकाळ शंखध्वनी केल्याने घरातील वास्तू दोष दूर होऊन आर्थिक उन्नती होते. घरामध्ये पैशांची कमतरता भासू नये यासाठी घराच्या आतमध्ये येणाऱ्या घोड्यांचे चित्र लॉबीच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावा. असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या कमी होतात.

घराच्या मुख्य गेटवर स्वस्तिक चिन्ह काढा

वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह काढल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश थांबतो. स्वस्तिक बनवताना लक्षात ठेवा की ते नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असावे.