घरातील वडीलधारी मंडळी नेहमी अस्ताव्यस्त शूज आणि चप्पल यांबाबत आपल्याला टोकत असतात. बहुतेक लोकांना हे कंटाळवाणे वाटते परंतु त्यामागील तर्क कोणालाच माहित नसेल. मात्र, वडीलधाऱ्यांनी अडवलं की आपण लगेच चप्पल सरळ करतो. चला तर मग जाणून घेऊया चप्पल उलटी ठेवल्याने काय त्रास होऊ शकतो.

लक्ष्मी नाराज होते :

असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट असतील तर ते ताबडतोब सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळेच उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे वडील सांगतात, त्यामागे कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही.

Astrology : ‘या’ दिवशी जन्माला आलेल्या लोकांना मिळतो मान-सन्मान; जन्मवार आणि वेळेवरून जाणून घ्या आपलं नशीब

घरामध्ये आजार वाढतात :

याशिवाय आणखी एक मान्यता अशी आहे की चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार, दुःख इत्यादी येतात. त्यामुळे चप्पल व बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर ते लगेच सरळ करा. चप्पल आणि शूज घरासमोर किंवा घरात उलटे ठेवल्याने घरात भांडण होऊ शकते, असेही मानले जाते. वृद्ध मंडळी सांगतात की, चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

विचारांवर वाईट प्रभाव पडतो :

असे म्हटले जाते की घराच्या दारात चुकूनही चपला आणि शूज उलटे ठेवू नयेत, याचा घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार, शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. त्यामुळे कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये खूप अडथळे येतात.

शनिचा प्रकोप कायम राहतो :

असे मानले जाते की घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच शनिदेवाचा प्रकोप राहतो, कारण शनिदेव पायांचा कारक मानला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)