घरातील प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरात ठेवल्याने सुखसमृद्धी येते, पण घरातील अशा काही वस्तू असतात, ज्या योग्य वेळी काढून टाकणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ तुटलेली काच, मूर्ती यांसारख्या वस्तू घरात ठेवण्यापूर्वी वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तुमच्याही घरात जर अशा काही तुटलेल्या, खराब झालेल्या वस्तू असतील तर सर्वात आधी काढून टाका.
१) जर तुमच्या घरातील देवतांच्या मूर्ती किंवा फोटो फाटले किंवा तुटले असतील तर ते आधी बदलून घ्या. यामुळे घरात एकप्रकारे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
२) तुटलेली काचही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
३) घरातील बंद पडलेले बल्ब किंवा लाईट सर्वप्रथम बदलायला हवा, कारण यामुळेही घरात एकप्रकारे नकारात्मक ऊर्जा जाणवते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
४) फाटके, जुने कपडे, चप्पलांचे जोड असतील तर ते फेकून द्यावेत.
५) घरात कबुतरांनी घरटे बनवले असेल तर तेही सर्वप्रथम काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवावे, कारण यामुळेही घरातील शांतता बिघडू शकते.
६) घरामध्ये काटेरी फुलांची रोपे लावू नयेत, असे केल्यानेही घरातील शांतता बिघडून आर्थिक नुकसान होण्याची भीती असते.
