Shukra Nakshatra Parivartan 2025: शुक्र हा ग्रह सौंदर्य, ऐश्वर्य, वैभव, प्रेम आणि धनसंपत्तीचा कारक मानला जातो. वेळोवेळी शुक्र नक्षत्र बदलत असतो, आणि याचे परिणाम थेट सर्व १२ राशींवर दिसून येतात. आता ८ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी शुक्र ‘कृत्तिका’ नक्षत्रातून बाहेर पडून चंद्रदेवाच्या ‘रोहिणी’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींसाठी प्रगतीचा, यशाचा आणि भरभराटीचा काळ सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, रोहिणी नक्षत्राचे स्वामी चंद्रमा असून, शुक्राचा या नक्षत्रातील संचार प्रेम, सौंदर्य, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये वाढ घडवून आणतो. ८ जुलैपासून ते २० जुलैपर्यंतचा कालखंड काही राशींसाठी विशेष शुभफलदायी राहणार आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…
शुक्राचे नक्षत्र बदल होताच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ?
मेष
शुक्राचा रोहिणी नक्षत्रातील गोचर मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरु शकतो. या कालावधीत तुमच्या नोकरीत सुधारणा होईल, व्यवसायात वाढ दिसून येऊ शकते. जुनं अडकलेलं धन मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात. या काळात वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडथळे असलेले कार्य या काळात पूर्ण होऊ शकतात. नात्यात गोडवा वाढेल.
सिंह
सिंह राशींसाठी हा काळ फारच शुभ ठरणार आहे. नोकरीतील पदोन्नती, वेतनवाढ, आर्थिक लाभ याचा अनुभव घेता येऊ शकतो. वाहन, घर किंवा जमीन खरेदीची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यालयात सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकेल. प्रवास लाभदायक ठरेल. धनलाभाबरोबरच सन्मान आणि प्रसिद्धी मिळू शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.
कन्या
कन्या राशींसाठी शुक्राचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश सौख्य, समाधान आणि धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. आनंददायी घटना घडू शकतात. अनपेक्षित पैशाचा लाभ, कामात यश, सामाजिक मान लाभू शकतो. नाते-संबंध सुधारतील आणि मानसिक समाधान लाभेल. मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी कौटुंबिक जीवनात आनंद राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)