वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कोणी राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर, देश आणि जगावर दिसून येतो. तसंच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. धन आणि वैभव देणारा शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. जी त्यांची सर्वात नीच राशी मानली जाते. म्हणजे कन्या राशीतील शुक्र अशुभ फल देतो. त्यामुळे या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण ३ राशी आहेत, ज्यांनी या काळात खूप काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

सिंह: शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी थोडे कष्टदायक ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत शुक्राचे द्वितीय भावात भ्रमण होणार आहे. ज्याला पैशाचे आणि वाणीचे घर म्हणतात. या काळात कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच यावेळी तुमचा तुमचा बॉस किंवा कामाच्या सहकाऱ्यांशी काही वियोग होऊ शकतो. एखाद्या विषयावर मानसिक अस्वस्थता असू शकते. मुलाच्या बाबतीत समस्या असू शकतात. यावेळी तुमच्या व्यवसायात पैसे कमी होऊ शकतात. दुसरीकडे सिंह राशीवर सूर्य देवाचे राज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्य देव यांच्यात वैराची भावना आहे. त्यामुळे तुम्ही जरा सावध राहा.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Mars will enter Pisces
मीन राशीत प्रवेश करणार मंगळ ग्रह! कर्क राशीसह ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ

आणखी वाचा : Chanakya Niti: या ५ लोकांशी कधीही शत्रुत्व करू नका; तुमचा नेहमीच पराभव होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल!

कर्क : शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी थोडे हानिकारक ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून शुक्र तिसऱ्या घरात प्रवेश करेल. ज्याला धैर्य-शक्ती आणि लहान भावंडांचे स्थान मानजे जाते. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य कमी होऊ शकते. तसेच भावंडांशी मतभेद होऊ शकतात. तुम्ही व्यवसायात हुशारीने निर्णय घ्या. व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. तसंच न्यायालयीन प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि चंद्र यांच्यात वैर आहे. त्यामुळे तुम्ही जरा सावध राहा.

मेष: शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी थोडे कष्टदायक ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत शुक्र सहाव्या भावात गोचर करणार आहे. ज्याला शत्रू आणि रोगाचे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला काही आजार होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. व्यवसायात नुकसान होऊ शकते. एक महत्त्वाचा करार अंतिम होता होता थांबू शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता असू शकते. अनावश्यक खर्च वाढू शकतो.