Venus Transit 2025 Taurus: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह वैभव, धन, प्रेम व भौतिक सुखाचा कारक मानला जातो. २९ जून रोजी दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे वृषभ ही शुक्राची स्वतःचीच राशी आहे, त्यामुळे हे गोचर अत्यंत शुभ मानले जात आहे. असं म्हणतात, जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलून अन्य राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याची अन्य राशींच्या कुंडलीतील स्थितीसुद्धा बदलते. सहाजिकच स्थान बदलल्यावर होणारा प्रभावसुद्धा कमी- अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात बदलत असतो. शुक्र हा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जात असल्याने त्याची स्थिती राशींच्या आयुष्यातील नात्यांवरसुद्धा प्रभावी ठरू शकते. शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. कोणत्या आहेत त्या नशिबवान राशी? आणि नेमका कसा फायदा होणार जाणून घेऊया..
उद्यापासून ‘या’ राशींचं नशिब पालटणार?
मेष
मेष राशीसाठी शुक्राचा गोचर एक राजयोग घेऊन येत आहे. व्यवसायात लाभाचे संकेत मिळत असून, पूर्वी आखलेली रणनीती यशस्वी ठरु शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ बळकटी देणारा ठरु शकतो. तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल, जोडीदारासोबत खास वेळ घालवता येईल.
कर्क
शुक्राच्या गोचरामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. गुंतवणूक करण्यासाठी ही उत्तम वेळ मानली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या समस्यांपासून सुटका मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठीही हे पर्व अभ्यासासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकणार आहे. प्रेमसंबंधांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर अत्यंत लाभकारी ठरु शकते. करिअरमध्ये मोठ्या संधी सहज प्राप्त होऊ शकतात. व्यावसायिकांना एखादी मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेत गुंतवणूक केल्याने फायदे होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता अधिक आहे. छोट्या प्रवासाचे योग आहेत. प्रेमजीवनात सकारात्मक बदल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)