Venus transite 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो, अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. तसेच जेव्हा शुक्राची चाल बदलते, तेव्हा त्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. शुक्र ग्रह सप्टेंबरमध्ये त्याची स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे त्याचा चांगला प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर होईल.
शुक्र करणार मूळ त्रिकोण राशीत प्रवेश (Venus transite 2024)
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ राशीतील प्रवेश खूप शुभ फळ देईल. या काळात तुम्हाला अनेक नव्या गोष्टी प्राप्त होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. समाजात मानसन्मान वाढेल. आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. नवीन जमीन खरेदी कराल. भाग्य तुमच्या बाजूने असेल. या काळात तुमचे मन खूप आनंदी असेल. धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. समाजात मानसन्मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील.
तूळ (Libra)
शुक्र तूळ राशीतच राशी परिवर्तन करणार आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप लाभदायी सिद्ध होईल. नवे मित्र-मैत्रिणी भेटतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आपल्या जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. कुटुंबीयांची प्रत्येक कामात मदत मिळेल. स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी होईल. नोकरी-व्यवसायात पद, प्रतिष्ठा प्राप्त होईल. पगारवाढ होईल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा तूळ राशीतील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील मानसिक ताण कमी होईल. धन-ऐश्वर्याची प्राप्ती होईल. आर्थिक परिस्थिती दूर होईल. धार्मिक कार्यात मन लागेल, तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. स्पर्धा परीक्षेत हवे तसे यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. दूरचे प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमच्या मनात अध्यात्माची ओढ असेल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)