Horoscope Today In Marathi 25 October 2025 : आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक तिथी असणार आहे. विनायक चतुर्थी आज पहाटे १ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत संपणार आहे. आज शोभन योग जुळून येईल आणि अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर गणपती आणि शनिदेवाच्या कृपेने तुमच्या नशिबात सुख-समृद्धी येणार का जाणून घेऊया…
विनायक चतुर्थी विशेष पंचांग व राशिभविष्य (Vinayak Chaturthi Special Today’s Horoscope 25 October 2025 )
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
