Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
दैनिक मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope )
पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope )
मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.
दैनिक मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope )
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
दैनिक धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope )
आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope )
तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.
दैनिक तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope )
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल.
बुध-शुक्राचा अर्धकेंद्र योग 'या' तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये देणार झपाट्याने वाढ; करिअरमधील प्रगतीसह पदोपदी मिळणार यश
१२ वर्षांनंतर शनीचा द्विद्वादश राजयोग, 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार बक्कळ पैसा; नोकरी व्यवसायात यश
१५ दिवसांतच पैशांचा पाऊस! नशिबाची लॉटरी लागणार? देवगुरूंच्या कृपेने 'या' राशींना मिळणार धनसंपत्तीचा खजिना!
दैनिक कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope )
कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.
दैनिक सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope)
प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope )
भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.
आजपासून 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती? मंगळ-चंद्र युतीमुळे सर्व काही होणार मंगल!
दैनिक मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope)
फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope )
आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.
दैनिक मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope )
तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.
३ जूनपासून 'या' ३ राशींचा सुरु होईल सर्वात कठीण काळ! शनि-रविच्या पंचक योगाने आयुष्यात घोंगावणार अडचणींचं वादळ
बक्कळ पैसा! सूर्यनारायण करणार बुधाच्या राशीत प्रवेश; 'या' तीन राशींच्या व्यक्तींना पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा प्राप्त होणार
Vinayak Chaturthi May 2025 : २९ की ३० मे, विनायक चतुर्थी कधी? २ योगांमुळे 'या' राशींचा दिवस होईल मोदकासारखा गोड
आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० मे २०२५ : Daily Horoscope Live Updates In Marathi