Weekly Numerology Predictions 1 To 7 September 2025 : या आठवड्यात शनी बुधाशह संयोग करून षडाष्टक योग निर्माण करणार आहेत. तसेच सिंह राशीत त्रिग्रही व बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक मूलांकांसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे. जाणून घ्या मूलांक १ ते ९ पर्यंतच्या लोकांचे साप्ताहिक अंकज्योतिष…

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक १ (Weekly Numerology Number 1 (Born on 1, 10, 19, 28)

मुलं किंवा जीवनसाथीच्या निष्काळजीपणामुळे चिंता वाढेल आणि त्यामुळे मानसिक ऊर्जा कमी होईल. शांततापूर्ण आणि आरामदायी कृतींमुळे जीवनात संतुलन परत येईल. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील. रचनात्मक क्षेत्रातील लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा होईल. आठवड्याच्या शेवटी विश्रांती घ्या.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक २ (Weekly Numerology Number 2 (Born on 2, 11, 20, 29)

हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. पदोन्नती किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनसाथीसह किरकोळ मतभेदांमुळे घरात तणावाचे वातावरण होऊ शकते. जवळच्या लोकांकडून घेतलेला सल्ला उपयुक्त ठरेल. फलदायी प्रवास घडेल. मीडिया, वैद्यकीय व बांधकाम क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ३ (Weekly Numerology Number 3 (Born on 3, 12, 21, 30)

या आठवड्यात नवीन अॅक्टिव्हिटीमधून पटकन पैसा कमावण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक भागीदारांसह सहयोग फायद्याचा ठरेल. घरगुती वातावरण ठीक राहील, पण आई-वडिलांच्या आरोग्यासह काही समस्या होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी सामाजिक कार्यक्रमात हरवलेला संपर्क पुन्हा मिळेल. काहींसाठी प्रेमसंबंधही जुळू शकतात.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ४ (Weekly Numerology Number 4 (Born on 4, 13, 22, 31)

या आठवड्यात उत्साह व ऊर्जा जाणवेल. मित्र व नातेवाईकांसह संबंध मधुर राहतील. मुलं आणि तरुण मंडळी तुमच्या कामात मदत करतील. तातडीच्या नफ्यासाठी गुंतवणूक योग्य ठरेल. मात्र, जड व कोलेस्ट्रॉलयुक्त अन्न टाळा. व्यायाम अधिक नियमित करा.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ५ (Weekly Numerology Number 5 (Born on 5, 14, 23)

हा आठवडा यश, हशा आणि व्यावसायिक प्रगती घेऊन येईल. व्यवसायात वाढ होईल व उत्पन्नात वाढ होईल. जुने थकलेले पैसे परत मिळतील. नवीन प्रकल्पांसाठी वेळ द्याल. प्रवास करणाऱ्यांनी कागदपत्रांबाबत काळजी घ्यावी. आर्थिक भागीदारी व नवीन गठबंधन टाळा. काहींसाठी विवाहाच्या चर्चा होऊ शकतात.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ६ (Weekly Numerology Number 6 (Born on 6, 15, 24)

लांब प्रलंबित प्रकल्प व कामांना प्राधान्य द्यावे लागेल. शैक्षणिक व सर्जनशील कार्य चांगले परिणाम देतील. घरातील एखादी व्यक्ती तणावाचे कारण ठरू शकते. समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुमची मुत्सद्दीपणा महत्त्वाची ठरेल. प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने करिअरला नवी दिशा मिळेल. प्रवासात खबरदारी घ्या, विशेषतः रात्रीचा प्रवास टाळा.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ७ (Weekly Numerology Number 7 (Born on 7, 16, 25)

हा आठवडा महिला व्यावसायिकांसाठी भाग्यवर्धक आहे. प्रवासातून दीर्घकालीन संबंध निर्माण होतील. सहकाऱ्यांमुळे तणाव निर्माण होईल. मात्र, विदेशातून मिळालेली चांगली बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. सामाजिक कार्यक्रम अपेक्षेपेक्षा कमी रोचक वाटू शकतात. मनोरंजनासाठी वेळ द्या.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ८ (Weekly Numerology Number 8 (Born on 8, 17, 26)

करिअरबाबत घाईचे निर्णय घेऊ नका. नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. प्रतिष्ठित लोकांशी बोलताना विचारपूर्वक बोला. कामासाठी सहकाऱ्यांचे सहकार्य घ्या. तुम्ही विरुद्ध लिंगाच्या लोकांना आकर्षित कराल आणि लोकप्रियता वाढेल. काहींसाठी नवीन रोमँटिक नातं सुरु होईल. आठवड्याच्या शेवटी घरी अनपेक्षित पाहुणे येऊ शकतात.

साप्ताहिक अंक राशिभविष्य मूलांक ९ ( Weekly Numerology Number 9 (Born on 9, 18, 27)

अति ताण टाळा. निवडलेल्या क्षेत्रात प्रगती फक्त संयमाने होईल. सेमिनार व व्याख्यानांमध्ये सहभाग उपयुक्त ठरेल. खर्च वाढतील पण कुटुंबाच्या मदतीने सांभाळता येतील. जीवनसाथीसोबत वागताना संयम ठेवा, अन्यथा घरातील शांतता बिघडेल. कुटुंब व मित्रांशी संवाद साधल्याने अनेक समस्या सुटतील.