उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या विजयासोबत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. तसंच अनेक विक्रम रचले असून याआधी कोणीही करु शकलं नाही अशी कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे झाला. गोरखनाथ मठाचे माजी महंत अद्वैयनाथ यांच्या संपर्कात आल्यानंतर अजय सिंह बिश्त योगी आदित्यनाथ झाले. योगी आदित्यनाथ यांचा लहानपणापासूनच अध्यात्माकडे कल होता. राजकारण आणि अध्यात्म हे दोन भिन्न मुद्दे आहेत पण योगींनी या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व मिळवले. कुंडलीतील ग्रहांच्या चांगल्या योगाचा परिणाम असल्याचं ज्योतिषांचं मत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीनुसार, त्यांचा लग्न सिंह असून कर्मकारक असल्याने सूर्य, शनि आणि बुध यांच्या युतीसह उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची अशी स्थिती व्यक्तीला राजसत्तेचा आनंद देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत गुरु पाचव्या स्थानात आहे. मात्र सहाव्या घरात राहूची शत्रुहंता योग तयार होत आहे. यावरून हे सिद्ध होते की तो स्वतःभोवती शत्रूंनी घेरलेला असेल पण तो शत्रूंवर वर्चस्व गाजवेल. याउलट जर आपण सातव्या घराविषयी बोललो तर चंद्र विराजमान आहे, ज्योतिष शास्त्रानुसार जर कुंडलीत सिंह राशी आणि सातव्या भावात चंद्र असेल तर अशा लोकांना वैवाहिक जीवनात सुख मिळत नाही.

UP Election: उत्तर प्रदेशात भाजपा विजयाच्या दिशेने, जाणून घ्या निवडणुकीत काय दिली होती आश्वासनं

केतुची महादशा: अकराव्या घरात पाहिल्यास शुक्र आहे आणि मंगळ या घरात तिसऱ्या स्थानावर आहे. तर केतू बाराव्या घरात आहे. यानुसार व्यक्तीचा काळ अद्भूत असणार आहे. २१ फेब्रुवारी २०१७ ते २०२४ या काळात केतूची महादशा असेल. २०१७ च्या निवडणुकीत केतूच्या महादशेतच त्यांचा विजय झाला होता, यावेळीही केतूच्या महादशेचा प्रभाव दिसत आहे. अशा स्थितीत १४ जानेवारी २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शनीचा फरक असेल. कर्म भावातत शनि असल्यामुळे न्यायाची परिस्थिती राहील. दुसरीकडे दशा बदलल्यास यानंतर शुक्राची महादशा सुरु होईल. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हा काळ त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What astrologer says about yogi adityanath raj yog rmt
First published on: 10-03-2022 at 18:36 IST