Lord Shiva’s Favourite Zodiac : श्रावण महिना हा शिवचा महिना मानला जातो. या महिन्यात शिवची पूजा आणि आराधना केली जाते. सध्या श्रावण महिन्याची चाहुल लागली आहे. येत्या २५ जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि २३ ऑगस्ट रोजी समाप्त होईल. महादेव खरं तर सर्व भक्तांवर दया आणि आपली कृपा दाखवतात. पण ज्योतिषशास्त्रामध्ये काही अशा राशींविषयी सांगितले आहे ज्या शिवच्या अत्यंत प्रिय राशी आहेत.
या राशी इतक्या भाग्यशाली असतात की शिवच्या कृपेने त्यांचे बिघडलेले कामे मार्गी लागतात आणि प्रत्येक अडचणीमध्ये भगवान शिव यांच्याबरोबर असतो. या लोकांवर शिवची कृपा नेहमी राहते. राशिचक्रातील त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मेष राशी (Aries Zodiac):
मेष राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा असते. त्यामुळे श्रावण महिन्यात जर हे लोक शिवची आराधना करत असेल आणि उपवास धरत असेल तर शिवचा आशीर्वाद या लोकांना खूप लवकर प्राप्त होतो. या लोकांना कष्टानुसार त्यांच्या मेहनतीचे फळ मिळतात. शिवच्या कृपेने हे लोक आयुष्यात खूप पुढे जातात.
मकर राशी (Capricorn Zodiac):
मकर राशीचे स्वामी कर्म फल दाता शनि आहे कारण शनि शिवला आपला प्रिय मानतो. त्यामुळे मकर रास ही शिवची प्रिय रास मानली जाते आणि मकर राशीच्या लोकांवर शिवची असीम कृपा दिसून येते. शिव यांना प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो. या लोकांवर कोणतेही संकट सहज येत नाही. तसेच या लोकांना शिव मेहनतीनुसार फळ देतो.
कुंभ राशी (Aquarius Zodiac):
कुंभ ही भगवान शिवची अतिशय प्रिय राशी मानली जाते. कारण शिवच्या कुंभ स्वरुपाच्या जटांमध्ये गंगेचा वास असतो. असं म्हणतात जेव्हा भागीरथ गंगाला स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन आले तेव्हा शिवने आपल्या जटांना कुंभ स्वरूप देऊन गंगेच्या प्रवाहाला कुंभ मध्ये धारण केले. त्यामुळे कुंभ सुद्धा भगवान शिवची प्रिय रास मानली जाते. या लोकांवर शिवची अपार कृपा दिसून येते. या लोकांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हे लोक सुखी आणि समाधानी राहतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)