शास्त्रात शंकराच्या उपासनेची पाच अक्षरे सांगितली आहेत. न, म, शि, वा आणि य ही ‘नमः शिवाय’ मधील पाच अक्षरे आहेत. शंकर हे विश्वाचे निर्माते मानले जातात. विश्व हे पाच घटकांनी बनलेले आहे आणि त्याच्या बरोबरच पुढे जात आहे. पृथ्वी, आकाश, जल, अग्नि आणि वायु. विश्वातील पाच घटकांनी शंकराचे पंचाक्षर मंत्र तयार होतात. हे विश्व जे पाच तत्वांद्वारे संचालित आहे, या पाच अक्षरांचा एकत्रित जप केला की सृष्टीवर नियंत्रण ठेवता येतं. या पाच अक्षरांचे रहस्य पुढीलप्रमाणे ओळखता येईल…

‘न’ अक्षराचा अर्थ

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न काराय नमः शिवायः॥

याचा अर्थ नागेंद्र. म्हणजे जे नाग धारण करतात. सतत शुद्ध राहण्याचे साधन नाही. म्हणजेच गळ्यात नाग धारण करणार्‍या आणि सदैव शुद्ध असणार्‍या भगवान शंकराला माझा नमस्कार असो. या अक्षराच्या वापराने माणूस दहा दिशांना सुरक्षित राहतो. तसंच ते निर्भयपणा देतं.

‘म’ अक्षराचा अर्थ

मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मे म काराय नमः शिवायः।।

म्हणजेच जे मंदाकिनी धारण करतात, म्हणजे ‘गंगा’. या अक्षराचा दुसरा अर्थ ‘शिव महाकाल’ असा आहे. या अक्षराचा अर्थ महाकाल आणि महादेव असाही होतो. या अक्षराचा उपयोग नद्या, पर्वत आणि पुष्प यांच्या नियंत्रणासाठी केला जात असे. कारण ‘म’ अक्षरात निसर्गाची शक्ती असते.

आणखी वाचा : ‘या’ ४ राशीचे लोक नखरेबाज असतात, प्रत्येक गोष्टीत त्यांचा अ‍ॅटिट्यूड दाखवतात!

‘श’ अक्षराचा अर्थ

शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै “शि” काराय नमः शिवायः॥

या श्लोकात शंकराचे स्पष्टीकरण दिले आहे. याचा अर्थ शंकराने सत्ता धारण करणे. हे सर्वात शुभ अक्षर आहे. या अक्षरामुळे जीवनात अपार सुख आणि शांती येते. शंकरासोबतच शक्तीचीही कृपा प्राप्त होते.

आणखी वाचा : Nag Panchami 2022: कधी आहे यंदाची नागपंचमी? जाणून घ्या पूजेचा शुभमुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

‘व’ अक्षराचा अर्थ

वषिष्ठ कुम्भोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय।
चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै “व” काराय नमः शिवायः॥

म्हणजेच ‘व’ हे अक्षर शंकराच्या मस्तकाच्या त्रिनेत्राशी संबंधित आहे. त्रिनेत्र म्हणजे शक्ती. तसेच हे अक्षर शंकराचे उग्र रूप सांगते. या डोळ्याद्वारे शिव हे विश्व नियंत्रित करतात. या अक्षराचा वापर करून ग्रह आणि नक्षत्र नियंत्रित केले जाऊ शकतात.

आणखी वाचा : Surya Gochar 2022: १७ ऑगस्टपर्यंत सूर्य देव कर्क राशीत राहील, ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव पंचाक्षर मंत्राचे शेवटचे अक्षर ‘य’ आहे. याबद्दल म्हटले आहे-

यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै “य” काराय नमः शिवायः॥

याचा अर्थ भगवान शिव आदि-अनादी आणि अनंत आहेत. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा शिव होते, जेव्हा सृष्टी आहे तेव्हा शिव आहे आणि जेव्हा सृष्टी नाही तेव्हा शिव असेल. हे पूर्णतेचे अक्षर आहे. जगात शिव हे एकमेव नाव असल्याचे हे अक्षर सांगते. नमः शिवायमध्ये जेव्हा तुम्ही ‘य’ म्हणता, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, भगवान शंकर तुमच्यावर शिवाची कृपा करत आहे.