Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, संपत्ती आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रहाने ३० नोव्हेंबर रोजी बुद्धी आणि व्यवसायाची राशी तूळ मध्ये प्रवेश केला आहे. शुक्राने मूळ त्रिकोण राशीत प्रवेश केल्यामुळे मालव्य राजयोग निर्माण झाला आहे. या योगामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो, त्यांना सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात. मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो ते जाणून घेऊया

वृषभ रास

वृषभ राशीच्या सहाव्या स्थानी मालव्य राजयोग तयार होत आहे. पंचमहापुरुषाचा हा राजयोग या राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतो. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तुम्हाला कष्टाचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहा, प्रवासाचीही शक्यता निर्माण होत आहे. वाहन, मालमत्ता, घर खरेदीसाठी हा काळ अतिशय चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तूळ रास

शुक्राची मूळ त्रिकोण राशी तुळ आहे. त्यामुळे या राशीसाठी मालव्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. तुम्हाला व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात लाभ मिळू शकतो. शुक्राच्या चांगल्या स्थितीमुळे व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

हेही वाचा – डिसेंबरमध्ये ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार? नोकरदार आणि राजकारणी लोकांसाठी ठरु शकतो सुवर्णकाळ

मिथुन रास

या राशीच्या पाचव्या स्थानी मालव्य राजयोग तयार होत आहे. या राशीच्या लोकांची अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. हा काळ प्रेम जीवनाच्या दृष्टीनेही चांगला आहे. या काळात अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मालव्य राजयोग विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. प्रगतीसह पदोन्नती होऊ शकते. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जाऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)