Ravi Pushya Yoga 2023: ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांबाबत माहिती सांगितली जाते, या २७ पैकी एक रविपुष्य नक्षत्र हे आहे. हे नक्षत्र सर्वात फलदायी योगांपैकी एक मानले जाते. असे मानले जाते की, पुष्य नक्षत्र जेव्हा रविवारी किंवा गुरुवारी येतो तेव्हा ते खूप शुभ लक्षण असते. हा योग अत्यंत शुभ दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. अशातच १० सप्टेंबर रोजी रविपुष्य योग तयार होत असून याच दिवशी अजा एकादशीही येत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, मालमत्ता खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना या दिवशी विशेष लाभ मिळू शकतो. तर त्या राशी कोणत्या ते जाणून घेऊया.

रविपुष्य नक्षत्र म्हणजे काय?

वैदिक ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांचा उल्लेख आहे. यापैकी पुष्य नक्षत्र ८ व्या स्थानावर येते, जे अमर मानले जाते. सोप्या शब्दात या नक्षत्राच्या निर्मितीने जीवनात स्थिरता येते. रविपुष्य नक्षत्राचा स्वामी शनि आहे, पण त्याचा स्वभाव गुरुसारखा आहे. यामुळे हा योग सुख, समृद्धी, वैभव आणि यश मिळवून देऊ शकतो.

रविपुष्य नक्षत्र कधी तयार होत आहे?

रविपुष्य योग १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी सुरू होईल आणि ते सप्टेंबर रोजी सकाळी ६.१५ पर्यंत राहील.

रविपुष्य नक्षत्र तयार झाल्याने पुढील राशींना लाभ होणार

मिथुन रास (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी रविपुष्य नक्षत्र खूप फायदेशीर ठरु शकते. लक्ष्मी देवीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात. नशिबाची साथ मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करु शकता. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असू शकता तसेच या परिस्थितीत तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमचे संभाषण कौशल्य खूप प्रभावी ठरु शकते.

सिंह रास (Singh Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी रविपुष्य नक्षत्र खूप फायदेशीर ठरू शकते. सूर्य या राशीत पहिल्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे पुष्य नक्षत्र बनल्याने धनामध्ये वाढ होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.

हेही वाचा- १० नोव्हेंबरपर्यंत शनीदेव ‘या’ राशींच्या नशिबाला देणार दिवाळीचं तेज; तुम्हाला मिळेल का पैशाचा बंपर धमाका?

तूळ रास (Tula Zodiac)

रविपुष्य नक्षत्र या तुळ राशीसाठीही भाग्यवान ठरू शकते. या काळात तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. योग्य निर्णय घेण्यासाठी पालक तुम्हाला साथ देऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. सामाजिक आदरही वाढू शकतो. तसेच व्यवसायात तुम्ही केलेल्या सर्व मेहनतीचे फळ मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)