22 March 2018

News Flash

तरुणीची छेड काढल्याच्या आरोपातून शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं

शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | Updated: March 12, 2018 2:43 PM

मनोज जैसवाल पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबादच्या नामांकित शिक्षण संस्थेत बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या तरुणची छेड काढल्याचा आरोप करत काही तरुणांनी शिक्षकाला काळं फासल्याची घटना घडली आहे. मनोज जैसवाल असं या शिक्षकाचं नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन जैसवाल याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पीडित तरुणी वाणिज्य शाखेत १२ वीच्या वर्गात शिकत आहे. मनोज जैसवाल हे गेल्या काही दिवसांपासून तरुणीला व्हीडिओ कॉल करून अश्लील संभाषण आणि मेसेज टाकत होता. ही बाब पीडित तरुणीच्या भावाला माहिती होताच, त्याने आपल्या परिचयातील काही मित्रांना सोबत घेत महाविद्यालय गाठून, स्टाफ रुममध्ये बसलेल्या जैसवाल यांच्या तोंडाला काळं फासलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, यानंतर तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी जैसवाल याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे.

 

First Published on March 12, 2018 2:43 pm

Web Title: 8 to 10 students blackened face of collage professor saying that he send sexual message to one of his female students
  1. No Comments.