News Flash

महामार्गावर ट्रक चालकाला लुटणारे दरोडेखोर गजाआड

औरंगाबाद दरोडा प्रतिबंधक पथक यांची कारवाई

सापळा रचून राहत्या घरातून दरोडा प्रतिबंधक पथकाने समीर आणि लखनला अटक केली.

खुलताबाद फुलंब्री रोडवर चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यातपोलिसांना यश आले आहे. औरंगाबाद दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. लखन थोरात आणि शेख समीर अशी आरोपीची नावे आहेत. वाळूज एमआयडीसीतून बियरचा माल घेऊन जाण्यारा ट्रग २३ तारखेला लुटण्यात आला होता. फुलंब्रीजवळील वारेगाव शिवारात ट्रक आला असता अज्ञात आरोपींनी ट्रक अडवून चालकाला चाकूचा धाक दाखवत ट्रकमधील माल लंपास केला होता. २३ एप्रिलच्या या घटनेनंतर चालक शेख याने फुलंब्री पोलिसात तक्रार दाखल केली होती.. तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु असताना खबऱ्यांकडून पोलिसांना या गुन्ह्यामध्ये लखन आणि समीर यांचा हात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून राहत्या घरातून दरोडा प्रतिबंधक पथकाने त्यांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना फुलंब्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सदर आरोपींवर नाशिक, अहमदनगरमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्यांकढून आणखी काही घटनांचे धागेदोरे लागतात का याची चौकशी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 5:59 pm

Web Title: aurangabad police arrested gang of robbers
Next Stories
1 दप्तरदिरंगाई विरोधात आजीबाईंचा एल्गार, औरंगाबादेत प्रशासनाचे धाबे दणाणले
2 मुसळ डोक्यात घालून पतीने केला पत्नीचा खून
3 औरंगाबादमध्ये ‘वॉटरकप’ स्पर्धेच्या महाश्रमदानात एकाचा मृत्यू
Just Now!
X