News Flash

गोठय़ास आग लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी भल्या पहाटेच्या सुमारास शॉर्ट सíकटमुळे गोठय़ास अचानक आग लागून शेतकरी दाम्पत्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी भल्या पहाटेच्या सुमारास शॉर्ट सíकटमुळे गोठय़ास अचानक आग लागून शेतकरी दाम्पत्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील खामसवाडी येथील सखाराम शंकर शेळके (वय ६५), त्यांची पत्नी शकुंतला शेळके (वय ६०) व मुलगा रामकिसन शेळके (वय १८) हे सर्वे नं ५३३ मधील शेतात गोठय़ात राहत होते. एक हेक्टर शेतजमीन असणाऱ्या सखाराम व त्यांचे कुटुंबीय दिवसभर शेतात काम करून मंगळवारी रात्री गाढ झोपले होते. या वेळी सखाराम शेळके आणि त्यांची पत्नी शकुंतला शेळके या एका खोलीत तर मुलगा रामकिसन दुसऱ्या खोलीत झोपला होता. सखाराम व शकुंतला शेळके ज्या खोलीत झोपले होते, त्या खोलीला बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली व गोठा असल्यामुळे पूर्ण गोठय़ाला आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत दोघा पती-पत्नींचा होरपळून मृत्यू झाला. तर मुलाला आगीचे चटके बसू लागल्यानंतर तो तत्काळ उठून घराबाहेर पडला. त्याने आपल्या आई-वडिलांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु भीषण आगीमुळे त्यास काहीही करता आले नाही.
खामसवाडी येथील या दुर्दैवी घटनेत सखाराम शंकर शेळके, त्यांची पत्नी शकुंतला शेळके, एक शेळी, चार पिलांचा जळून मृत्यू झाला आहे. याशिवाय १० िक्वटल सोयाबीन, १० िक्वटल कापूस, पाच िक्वटल पिवळी व संसारोपयोगी साहित्य, असे जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. या गोठय़ास शॉर्टसíकटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घटनेची माहिती उशिरा का होईना तहसीलदार सुरेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी नितीनचंद मंडोळे, तलाठी एम. पी. कांबळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एन. के. सुतार, पशुवैद्यकीय अधिकारी देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहाजी शंकर शेळके यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 1:20 am

Web Title: farmer couple died in fire
टॅग : Fire,Osmanabad
Next Stories
1 बीडचे ब्लॅकमेल प्रकरण वेगळ्या वळणावर
2 पोलिसांनो मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवा, विश्वास नांगरे पाटलांचे आदेश
3 ‘शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यात लातूर जिल्हा राज्यात आघाडीवर’
Just Now!
X