ब्लॅकमेल गुन्ह्यातील तरुणीच्या साथीदाराला पोलिसांनी खाक्या दाखवताच नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. त्या  तरुणीबरोबर  लग्न न करताचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये औरंगाबाद येथे बेगमपुऱ्यात भाडय़ाने खोली घेऊन राहिलो तसेचअश्लिल चित्रफीत तयार करून ब्लॅकमेल करण्याची कल्पना आपलीच असल्याचे तरुणीच्या साथीदारांनी पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे अन्य दोन व्यापाऱ्यांचीही चित्रफीत तयार केल्याची कबुलीही त्याने दिली. पोलिसांनी चित्रफीत ताब्यात घेतल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. तरुणीच्या तक्रारीवरून दोन प्राचार्याविरुध्द दाखल झालेल्या लंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वत्र चर्चा होत असताना तरुणीच्या साथीदाराच्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी बीडमध्ये येऊन चौकशी केली.
बीड शहरात ९ डिसेंबर रोजी एका तरुणीला प्राचार्याकडून दीड लाख रुपयांची खंडणी घेताना अटक करण्यात आली. त्यावेळी तिचा साथीदार पसार झाला. दरम्यान जामीनावर सुटल्यावर तरुणीने आपल्यावरच लंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिल्याने दोन प्राचार्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाल्याने नागपूर अधिवेशनातही हे प्रकरण चच्रेत आले. सोमवारी तरुणीच्या फरार साथीदाराला पोलिसांनी अटक करून आणले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. तरुणीबरोबर लग्न न करताच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण औरंगाबाद येथे भाडय़ाने खोली करून राहत होतो. औरंगाबाद शहरातील लक्ष्मी नामक महिलेच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधला जात होता. त्यातून तरुणीबरोबर प्राचार्याची अश्लिल चित्रफीत तयार करून त्याला ब्लॅकमेल करण्याची कल्पना आपलीच होती. अन्य दोन व्यापाऱ्यांचीही चित्रफीत तयार केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तरुणाच्या मोबाईलचा डाटा जप्त केला असून अन्य किती लोकांना ब्लॅकमेल केले आहे, याचा तपास केला जात आहे. तरुणीच्या तक्रारीवरून दोन प्राचार्यावर गुन्हा दाखल झाल्याने प्रकरण राज्यभर चच्रेत आहे. विविध सामाजिक, महिला संघटना गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याना कडक शिक्षा करावी, यासाठी मागणी करत आहेत. दुसरीकडे तरुणीने सुरुवातीला फरार झालेल्या तरुणाला आपण ओळखत नसल्याचेच सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. तरुणाला अटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून दोघेही संगनमतानेच अश्लिल चित्रफीत बनवून ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आल्याने हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. पोलीस तपासात आणखी काही माहिती बाहेर येते का, याकडेच लक्ष लागले आहे.