येथील मौलाना आझाद शिक्षण संस्था, मौलाना आझाद शिक्षण ट्रस्टच्या अध्यक्षा तथा ताज समूहद्वारा प्रकाशित ताज पत्रिकेच्या संपादिका पद्मश्री फातिमा रफिक झकेरिया यांचे मंगळवारी दुपारी येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ‘न्यूज वीक’चे अमेरिकास्थित पत्रकार फरीद झकेरिया व उद्योगपती अरशद झकेरिया ही दोन मुले आहेत.

माजी मंत्री रफिक झकेरिया यांच्या निधनानंतर फातिमा झकेरिया यांच्यावर मौलाना आझाद शिक्षण संस्था व ट्रस्टच्या कार्याची जबाबदारी आली. गरीब, मागास, शोषित वर्गातील महिला, अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले. शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २००६ साली फातिमा यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७० साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. अभ्यासपूर्ण लिखाणासाठी त्यांना १९८३ साली सरोजिनी नायडू पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रीय इंग्रजी समाचार पत्रामध्ये वरिष्ठ सहायक संपादक असताना त्यांनी घेतलेली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, ब्रिटेनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची मुलाखत गाजली होती. त्यांनी मुंबई विश्व विद्यालयचे सिनेट म्हणूनही काम केलेले आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र