25 October 2020

News Flash

राज ठाकरे आज लातूरच्या दौऱ्यावर

३ हजार लिटरच्या २० टाक्यांचे लोकार्पण, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन टँकरचे व फिरत्या पाणपोईचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लातूर एक्सप्रेसने उद्या (बुधवारी) सकाळी ६.३० वाजता लातूरला येत आहेत. शहरात सकाळी ९ वाजता ३ हजार लिटरच्या २० टाक्यांचे लोकार्पण, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन टँकरचे व फिरत्या पाणपोईचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
दुपारी निलंगा येथे न्यायालयात ते उपस्थित राहतील. तेथून उस्मानाबाद जिल्हय़ातील जळकोट येथे मनसेतर्फे चालू असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी ते करणार आहेत. आमदार बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई आदी नेते त्यांच्यासमवेत राहणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:24 am

Web Title: raj thackeray latur visit
Next Stories
1 तूर, हरभरा डाळीचे भाव पुन्हा गगनाला
2 काम मिळत नसल्याने मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
3 सामुदायिक विवाहसोहळ्यानिमित्ताने दानवे-लोणीकरांच्या स्वतंत्र चुली!
Just Now!
X