News Flash

शेतकऱ्यांच्या सहभागातून शरद जोशी यांचे स्मारक

शेतकऱ्यांच्या सहभागातून अंगारमळा येथे शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना न्यासाचे रवी काशीकर यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या सहभागातून अंगारमळा येथे शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना न्यासाचे रवी काशीकर यांनी दिली. विश्वस्त न्यासांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. न्यासाच्या अध्यक्षपदी काशीकर यांची निवडही करण्यात आली. येत्या ३१ जानेवारीला येथे शेतकरी संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
आंबेठाण येथील अंगारमळ्यात शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान निर्माण होईल, असे भव्य स्मारक शेतकऱ्यांच्या सहभागातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या वाटचालीची पुढील दिशा ठरविण्यासाठी येथे विशेष बैठक होणार आहे. न्यासाच्या बैठकीस रामचंद्र बापू पाटील, भास्करराव बोरावके, सुरेशचंद्र म्हात्रे, बद्रीनाथ देवकर, गोविंद जोशी, वामनराव चटप, अनंत देशपांडे, संजय पानसे, अलका दिवाण व जोशी यांच्या दोन्ही कन्या श्रेया व गौरी उपस्थित होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 1:53 am

Web Title: sharad joshi memorial
टॅग : Sharad Joshi
Next Stories
1 अंबाजोगाईत रोहयोची निकृष्ट कामे; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी
2 अजंता फार्माला दिलेली ८४ एकर जमीन ३२ शेतक ऱ्यांना परत
3 ‘शेतकरी एकजुटीचा आवाज खासदारकी देऊन दाबला’-रघुनाथदादा पाटील
Just Now!
X