औरंगाबादमधील जीन्सी पोलीस स्थानकाच्या हद्दीत अज्ञात इसमान पार्किगमध्ये लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून त्याचा कोळसा झाला. शहर आणि परिसरात दुचाकी जाळण्याच्या अनेक घटना घडत होत्या. गेल्याकाही दिवसात दुर्घटनांना आळा बसला होता. मात्र मंगळवारी पहाटे जीन्सी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर दुचाकी जाळल्याची घटना घडली.

जीन्सी पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या खासगेट बायजीपुरा भागात दुचाकी पार्क केलेल्या होत्या. पहाटेच्या दरम्यान त्या पेटवण्यात आल्या. यामध्ये राशिद खान हाफिजउल्ला खान यांची लाल रंगाची (टी-२० पल्सर एम.एच.२०इ.ए.२५९४) सय्यद मेराज अली सय्यद मकसूद अली यांची (एम.एच-२०,सी.एफ-६६४४) सीटी डीलक्स आणि (एम.एच-२०,बी.एस-६६४४) क्रमांकाची एक्टिवा. तर मोहम्मद अय्यूब मोहम्मद सुभान यांची (एम.एच-२० क्यू,४३२७) पॅशन प्लस गाडी आगीत जळून खाक झाली.

दुचाकी जळीत घटनेप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शहरासह परिसरात दुचाकी जाळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुन्हा दुचाकी जळीतकांडाची घटना घडल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.