News Flash

पैठण येथे शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

आंघोळ करत असताना अचानक तोल जावून पाण्यात पडला.

पैठण येथे शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू
सकाळी ईदची नमाज अदा करुन घरातील बकऱ्यांना चारा आणण्यासाठी असद पठाण आणि त्याचा चुलत भाऊ दुचाकीवरून शेतात गेले होते.

पैठण तालुक्यातील थेरगाव येथे शनिवारी दुपारच्या सुमारास स्वत:च्या शेतातील शेततळ्यात पडुन एक युवक मरण पावल्याची घटना घडली. असद नसीर पठाण (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून ईदच्या दिवशी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळी ईदची नमाज अदा करुन घरातील बकऱ्यांना चारा आणण्यासाठी असद पठाण आणि त्याचा चुलत भाऊ दुचाकीवरून शेतात गेले होते. बकऱ्यासाठी चारा घेतल्यानंतर उकाडा असल्याने असद शेततळ्यात आंघोळ करायला गेला. आंघोळ करत असताना अचानक तोल जावून पाण्यात पडला. असद पाण्यात पडल्याचे त्याच्या चुलत भावाने पाहिले. त्याने लगेच शेजारील लोकांना बोलावून असदला बाहेर काढून लगेच पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. परंतु शरीरात जास्त पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

बकरी ईदच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत असद हा बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 7:57 pm

Web Title: youth dies in paithan to collapse in sheth tale
Next Stories
1 देखभाल दुरुस्ती निर्णयाने जायकवाडीच्या लाभक्षेत्रात सिंचन घटणार
2 औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा
3 औरंगाबादेत तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
Just Now!
X