औरंगाबाद शहरात गुरूवारी ६२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली. यामध्ये ३४ पुरूष आणि २८ महिलांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७४९ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे शहरातील उस्मानपुरा भागातील अवघ्या अठरा महिन्याच्या बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे. दिवसभरात एकुण १० मुलं बाधीत आढळले. यात सहा मुली व चार मुलं असून यामध्ये १८ अठरा महिने ते सोळा वर्ष असे त्यांचे वय आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दोन दिवसांत शहरातील पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी पहाटे हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा करोना व इतर आजाराने मृत्यू झाला. आता शहरातील मृतांचा आकडा चिंताजनक असून तो २० वर पोचला आहे. घाटीमध्ये आज 10 जणांचा स्वॅब घेण्यात आला, त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. परंतु कालच्या नमुन्यातील दहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सध्या मिनी घाटीत ८५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

१७ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले.

औरंगाबाद जिल्ह्यातील गुरूवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
भीमनगर (15), पडेगाव (01), उस्मानपुरा (07), सिल्क मिल कॉलनी (01), कांचनवाडी  (01), नारळीबाग (01), आरटीओ (02), गरम पाणी (01), बन्सीलाल नगर (01), सातारा (08), हुसेन कॉलनी (02), दत्त नगर (01), न्याय नगर (02), पुंडलिक नगर (01), संजय नगर – मुकुंदवाडी (03), गुरू नगर (01), नंदनवन कॉलनी (01), गारखेडा (01), शहनुरवाडी (01), बेगमपुरा (01), अन्य (01), आलोक नगर, सातारा परिसर (01), पुंडलिक नगर (01), संजय नगर (01), बजाज नगर (वाळूज) (01), किराडपुरा (01), बारी कॉलनी, रोशन गेट, गल्ली क्र. 12 (01), असेफिया कॉलनी (01), कटकट गेट (01), इंदिरा नगर, बायजीपुरा (01) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 month old baby infected with corona in aurangabad nck
First published on: 15-05-2020 at 08:07 IST