छत्रपती संभाजीनगर – वाळूचे वाहन चालवण्यासह व त्यापोटी कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्यातील अंबड तहसील कार्यालयातील महसूल सहायक व एका कोतवालाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी पकडले. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रवीण लक्ष्मण पवार व खांडागळे, अशी लाच घेणाऱ्यांची नावे असल्याची माहिती सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी दिली. प्रवीण पवार हा अंबड तहसील कार्यालयात महसूल सहायक आहे. तर खांडागळे हा कोतवाल म्हणून काम पाहतो. प्रवीण पवार याने तक्रारदाराची वाळू वाहतूक करताना यापूर्वी पकडलेली गाडी सोडल्याचा मोबदला व यापुढे वाळू वाहतूक सुरूच ठेवून कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. २८ व २९ डिसेंबर रोजी ५० हजारांची मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून खांडागळे हा ५० हजारांची लाच प्रवीण पवार याला देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहित करत होता.

हेही वाचा – ‘भैरवनाथ’ साखर कारखान्याची फसवणूक

हेही वाचा – फडणवीस-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर; राजकीय टिप्पणी मात्र टाळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवल्यानंतर त्याची पडताळणी झाली. लाच देण्याविषयी तक्रारदार व लाच घेणाऱ्यांमध्ये संवाद झाल्याची खातरजमा झाल्यानंतर पथकाने सापळा रचला. रविवारी वरील दोन्ही लाच घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.