छत्रपती संभाजीनगर: वाळूज भागामध्ये संशयित एका सराईत गुन्हेगाराचा एन्काऊंटर झाल्याची माहिती असून, पोलीस सूत्रांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील माहितीसाठी प्रतिसाद दिलेला नाही.

अमोल खोतकर, असे एन्काऊंटर झालेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव असल्याची माहिती आहे. वाळूज औद्योगिक वसाहत भागातील बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्यात सहभागी होता आणि त्याला पकडण्यासाठी मध्यरात्री पोलिसांचे पथक गेले असता त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना नाविलाजाने एन्काऊंटर करावा लागला, अशी एक प्राथमिक माहिती आहे.

संतोष लड्डा हे पत्नीसह अमेरिकेत गेले होते सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून घरातील ८ कोटी रुपये किमतीचे ५.५ किलो सोने व ३२ किलो चांदी दरोडेखोरांनी मध्यरात्री पळवून नेल्याची थरारक घटना उघडकीस आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बजाजनगर, वाळूज परिसर व सातारा भागात एकाच आठवडाभरातच दरोड्याच्या तीन घटना घडल्याने दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सातारा भागातील दरोड्याच्या घटनेत पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दोन दिवसातच एन्काऊंटरसारखी घटना घडली असून, मागील दहा वर्षात अशी घटना अलिकडच्या काळात घडली नाही.