छत्रपती संभाजीनगर : ईव्हिएम यंत्र थांबवण्याचे तंत्र (हॅक) आपल्याकडे असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी एका हाॅटेलमधून एक लाख रुपये घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2024 रोजी प्रकाशित
ईव्हिएम यंत्र थांबवण्याचे तंत्र सांगणाऱ्याकडून अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी, आरोपी ताब्यात
आरोपीचे नाव मारोती ढाकणे असून तो नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातला रहिवासी आहे. ढाकणे सैन्य दलामध्ये जवान असून जम्मू काश्मिरमध्ये सेवेत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-05-2024 at 20:44 IST
TOPICSछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhaji Nagarलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person arrested by chhatrapati sambhaji nagar police who claiming hacking of evm machine asj