छत्रपती संभाजीनगर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा मुकुंदवाडीत काही अतिक्रमणधारकांनी अडवण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केला. मात्र, ताफा अडवण्यासाठी हालचाली होत असल्याची माहिती कळताच मुकुंदवाडी पोलिसांनी संबंधितांना रोखून बाजूला केले. या माहितीला मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी दुजोरा दिला. राज्यपाल बागडे यांचा ताफा सुरळीतपणे पुढे गेल्याचे इंगोले यांनी सांगितले.

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झाले असून, पुढील चार दिवस ते शहरात आहेत. रविवारी ते एका कार्यक्रमस्थळी जात असताना अतिक्रमणधारकांनी ताफा अडवण्याची हालचाल केली होती. मुकुंदवाडीत दोन दिवसांपूर्वी तीन जणांना चाकूने भोसकले होते. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवसापासून मुकुंदवाडीतील २२९ अतिक्रमणे हटवण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आली. कसल्याही नोटिसीविना अतिक्रमण काढण्यात आल्याचा आणि सत्ताधारी पक्षातील तीन आमदारांच्या दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप अतिक्रमणधारकांनी यापूर्वीच केला आहे.