छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव असलेला वाल्मीक कराड याने यापूर्वीच्या काही सुनावणी वेळी आपल्याला दोष मुक्त करावे असा अर्ज आज बीड जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला.
कराडसह इतर विष्णू चाटे व अन्य आरोपींनी त्यांचे नाव वगळण्याबाबत केलेल्या अर्जावर सरकारी पक्षातर्फे हरकत घेण्यात आली असून आरोपींची एक ही व्यूहरचना आहे आणि त्यामागे वेळकाढूपणाचा करण्याचा उद्देश असल्याचे दिसत आहे , असेही आम्ही न्यायालयासमोर सांगितल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.
वाल्मीक कराड याचे बँक खाते गोठवण्याशी संबंधित व संपत्तीच्या संबंधित अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला. मात्र, इतर किरकोळ कागदपत्राशी संबंधित वाहनाशी संबंधित अर्ज न्यायालयाने आमचे मंजूर केले असेही ॲड्. निकम यांनी सांगितले. विष्णू चाटेचा अर्ज हा विलंबाने दाखल करण्यात आलेला आहे.
नियमाप्रमाणे दोष मुक्तीचा अर्ज हा दोन महिन्याच्या आत करणे अपेक्षित असते. परंतु विष्णू चाटे चा अर्थ हा उशिराने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयापुढे सांगितले. तसेच न्यायालयात ड्राफ्ट चार्ट दिलेला असून, त्याचा वाल्मीक कराड व इतर त्याच्या साथीदारांवर विविध कलमान्वये १२ ते १४ आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाला मदत होईल, असाही एक अर्ज मंगळवारच्या सुनावणीवेळी सादर केलेला आहे. वरील वरील अर्जावर आरोपींनी जो दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला आहे, त्याचा निर्णय होईल तेव्हाच सुनावणी होईल, असे ॲड. निकम यांनी सांगितले.