जिल्ह्यत सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हिंगोलीतील खटकाळी व अकोला बायपासवर केलेल्या आंदोलनात काँग्रेसचे खासदार राजीव सातव, आमदार रामराव वडकुते, माजी खासदार शिवाजीराव माने, हिंगोली बाजार समितीचे सभापती रामेश्वर िशदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ११ पासून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे जि. प. निवडणूक प्रचारानिमित्त पानकनेरगाव येथे जात असताना रस्त्यावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू होते. त्याकडे पाठ फिरविण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून कार्यक्रमस्थळी आणल्याने आंदोलन संपेपर्यंत मुटकुळेंना आंदोलनात सहभाग नोंदवावा लागला.

याचप्रमाणे हिंगोली, औंढा महामार्गावर डिग्रस कऱ्हाळे पाटीवर मराठा क्रांती मार्चाच्या वतीने सकाळी ११ ते १ पर्यंत चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव, लोहगाव, सावळी, संतुकिपपरी, िपपरी कुंडकर, हिवरा, बोरजा, जडगाव, येहळेगाव आदी गावातील कार्यकत्रे  मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या ठिकाणी मुस्लीम, शीख, धनगर, जैन, वंजारी, कोष्टी, मारवाडी असे विविध समाजातील लोक सहभागी झाले होते. परभणी-वसमत रोडवरील आरळ फाटय़ावरसुध्दा मोठय़ा प्रमाणात कार्यकत्रे जमा झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

वसमत-औंढा रस्त्यावरील जिंतूर टी-पाईंटवर करण्यात आलेल्या आंदोलनात कवठा फाटा, हयातनगर, गणेशपूर, आंबाचोंढी, शिरडशहापूर आदी गावातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वारंगाफाटा, आखाडा बाळापूर तसेच कळमनुरी तहसील कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनातसुध्दा मोठय़ा संख्येने कार्यकत्रे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कळमनुरी येथील आंदोलनकर्त्यांनी वाहने अडविण्यासाठी रस्त्यावर दगड व काचांचा वापर केला होता. हिंगोली-वाशिम रस्त्यावर कनेरगाव नाका येथे मोठय़ा प्रमाणात आंदोलनकत्रे जमल्याने संपूर्ण वाहतूक खोळंबून ५ ते ६ कि. मी. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सेनगाव तहसील कार्यालयासमोरसुध्दा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakka jam maratha morcha in hingoli
First published on: 01-02-2017 at 01:16 IST