छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण ४४ आरोपींविरुद्ध कारवाई केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ५५० किलो गांजा व बेकायदेशीररीत्या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या दोन हजार औषधी गोळ्या व एमडी पावडर, असे एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्याद्वारे विशेष मोहीम राबवून ४४ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.