छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी कधी काळी ऑनलाइन पद्धतीने हिरावलेली रक्कम १११ तक्रारदारांना लाभली. शहर पोलिसांच्या सायबर विभागाकडून ७० लाखांची रक्कम परत करण्यात आली तेव्हा मूळ तक्रारदारांचे चेहरे उजळले आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

सण, उत्सव काळात ऑनलाइन खरेदीवर आकर्षक सूट, बक्षीस, रोख परताव्याच्या सवलतींच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जाते. याच संधीचा फायदा घेऊन सायबर भामट्यांकडून खरेदीदारांना फसवले जाते. जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत फसवण्यात आलेल्या १११ तक्रारदारांचे विविध राज्यांत असलेल्या सायबर भामट्यांकडून वसूल केलेले ७० लाख दिवाळीला पाडव्याच्या दिवशी परत करण्यात आले. या वसूल रकमेत सर्वाधिक ३१ लाख झारखंड राज्यातून, १६ लाख उत्तर प्रदेशातील नोएडातून, १४ लाख दिल्लीतून व नऊ लाख इतर राज्यांतून वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

Vasai, Death sanitation workers,
वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत
rajan vichare show of strength for lok sabha
ठाण्यात राजन विचारेंच्या शक्तीप्रदर्शनाला जुन्या जाणत्यांची साथ, इंडिया आघाडीतील घटक पक्षही सहभागी
hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका

हेही वाचा : याला म्हणतात जबरा फॅन! विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीसाठी तरुणीने सुरु केले उपवास

एटीएममध्ये बनावट पाट्या

“अनेक एटीएममध्ये तुम्हाला काही अडचण आली तर मदतीसाठी अमूक टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा’ अशी पाटी लावलेली असते. बऱ्याच वेळा अशी पाटी बनावट असल्याची आणि बँकेकडून अधिकृतरीत्या लावण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. अशा टोल फ्री क्रमांकावर संपर्क करणाऱ्या ग्राहकांनाही फसवण्यात आल्याच्या तक्रारी असून, पाटी अधिकृत बँकेनेच लावलेली आहे का, याची खात्री करणे गरजेचे आहे” – प्रवीणा यादव, पोलीस निरीक्षक

हेही वाचा : प्रदूषणाबाबत कलावंतांमधून चिंतेचा सूर ; व्यक्तिगत जबाबदारी मानली तरच मुक्ती- पं. कोमकली

सायबर फसवणुकीचे नवे प्रकार

सायबर फसवणुकीचे काही नवीन प्रकार समोर आले आहेत. यामध्ये शहरातील काही नागरिकांचे मोबाइल फोन चोरून त्यांच्या फोन पे, गुगल पे, पेटीएम आदी वाॅलेटचा वापर करून मोबाइलधारकांची सर्व रक्कम मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानावर जाऊन त्यांना ऑनलाइन पाठवून त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली जात असल्याचे प्रकार समोर आल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.