छत्रपती संभाजीनगर : उद्योजक प्रशांत नड्डा यांच्या घरावरील दरोड्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दरोड्यातील एक आरोपी पोलीस चकमकीमध्ये मारला गेला होता. त्यामुळे पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. या दरोड्यातील आरोपींचे पोलिसांशी संबंध असल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केल्यानंतर पोलीस चकमक झाली होती.

आता या दरोड्याचा कट रचणाऱ्या चार जणांना अटक केली असल्याचा पोलिसांचा दावा होता. या दरोड्यात साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी व ७० हजार रुपये रोख रक्कम पळविण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्यातील आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासगी नोकरी करणारे बालासाहेब चंद्रकांत इंगोले (वय ४६, रा. सूर्यवंशीनगर, सिडको, वाळूज महानगर), औषध दुकानचालक महेश दादाराव गोराडे (वय २६, रा. वडगाव कोल्हाटी), गणेश गंगाधर गोराडे (वय २२, रा. सिडको, वाळूज महानगर), किराणा दुकानदार आजिनाथ पुंजाराम जाधव (वय २२) या चौघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.