छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, रोकड आदी तीन कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना १५ मे रोजी घडली होती. या दरोड्यातील पाच आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देवरे यांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मंगळवारी पोलीस चकमकीत ठार झालेला अमोल बाबूराव खोतकर याच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूची चौकशी करून दोषींना अटक करण्याची भूमिका घेत अमोलचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर बहीण व वडिलांची समजूत घातल्यानंतर त्यांनी अमोलचा मृतदेह स्वीकारून त्याच्यावर पडेगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल हा संतोष लड्डा यांच्या घरातील दरोड्याच्या घटनेचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल होते. उर्वरीत आरोपींमध्ये योगेश हाजबे (वडगाव कोल्हाटी), सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सोहेल जलील शेख (दोघेही रा. अंबाजोगाई), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरोद्दीन (रांजणगाव), महेंद्र माधवराव बिडवे (रा. साजापूर) यांचा समावेश असून, त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.