छत्रपती संभाजीनगर : शहरातील विद्यादीप बालगृहात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७५ मुलींनी अचानक एकत्र येत घोषणाबाजी करत अचानक आंदोलन छेडले. अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचारी सिस्टर यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे काही मुलींकडून समजले. रात्री नऊपर्यंत गोंधळ सुरू होता. दरम्यान, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सिस्टर आमच्यावर प्रेम करतात, त्यांचा काही दोष नाही… त्यांना सोडा, आम्हाला त्या परत हव्यात! अशा घोषणा आंदोलनातील मुली वारंवार देत होत्या. संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या गोंधळाची माहिती मिळताच जिल्हा बालकल्याण समितीचे पथक तातडीने बालगृहात दाखल झाले. त्यांनी मुलींना समजवण्याचा प्रयत्न केला.

मात्र मुली भावनिक अवस्थेत असल्याने त्या कोणाचंही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. परिणामी समितीने पोलिस बंदोबस्त मागवला. सुमारे ७० ते ८० पोलीस, दंगाकाबू पथक, तसेच पोलीस उपायुक्त पंकज आतुलकर, सहाय्यक आयुक्त सानप, सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव, दामिनी पथकाच्या महिला अधिकारी निर्मला निंभोरे व कांचन मिरधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळ पासून रात्री ९ वाजेपर्यंत तणावपूर्ण वातावरण कायम होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफवांचे पेव, पोलिसांची धावपळ

बालगृहाबाहेर गोंधळ वाढत असताना परिसरात पुन्हा एखादी मुलगी पळून गेली असावी, अशी अफवा पसरली. यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. गोंधळ, अफवांच्या परिस्थितीत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली. याच गोंधळात महिला पोलीस कर्मचाऱ्याला चक्कर या गोंधळादरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास भोवळ आल्याने त्या कोसळल्या. त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले.