शेजाऱ्यांच्या वादावरून पतीकडून मारहाण, छळ होत असल्याचे कारण देत गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या सविता दीपक् काळे ( वय ३२, रा. मांडवी, ता. गंगापूर) या महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धोरण ठरवण्याच्या सूचना; याचिक जनहित याचिकेत रूपांतरित होण्याची शक्यता

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सविताचा मृत्यू झाल्याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. सविताने गुरूवारी स्वतःवर डिझेल ओतून पेटवून घेतले होते. गंभीररीत्या भाजलेल्या सविताला पोलिसांनी घाटीत दाखल केले होते. बेगमपुरा पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्यात येत असल्याचे गुरूवारी सांगितले होते.