लोहारा तालुक्यातील उंडरगाव शिवारात पाण्याच्या शोधामध्ये फिरणाऱ्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तालुक्यातील उंडरगाव शिवारात ही घटना घडली.
दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधामध्ये फिरावे लागते. गाव वस्त्या गाठून जेथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन जनावरे तहान भागवतात. वनीकरणामध्ये शासनाने नावालाच पाणवठे बांधले. मात्र, ते कोरडे ठाक पडल्याने ते पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु पाण्याची स्थिती भयावह झााल्याने हरणाचे कळप पाण्याच्या शोधामध्ये फिरत आहेत. उंडरगाव येथील शेतकरी व गावचे उपसरपंच साहेबराव बनाजी सूर्यवंशी यांच्या शेतातील पन्नास फूट विहिरीमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या एका हरणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती वनरक्षक बी. एम. व्हटकर यांना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2015 रोजी प्रकाशित
पाण्याच्या शोधात हरणाचा विहिरीत पडून मृत्यू
लोहारा तालुक्यातील उंडरगाव शिवारात पाण्याच्या शोधामध्ये फिरणाऱ्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तालुक्यातील उंडरगाव शिवारात ही घटना घडली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-12-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deer died in well in search of water