Dhule Solapur Highway Accident Six Dies in Chhatrapati Sambhajinagar : अपघात झालेले वाहन बाजूला सरकावण्यास मदतीसाठी धावलेल्या सहा जणांना भरधाव आलेल्या अन्य एका वाहनाने चिरडले. यात सहा जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री ही घटना सोलापूर-धुळे महामार्गावरील गढी (ता. गेवराई) जवळ घडली.
बाळासाहेब आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सुरय्या, भागवत परळकर व सचिन ननवरे, अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली. या सहा जणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवासी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत सर्व गेवराई व परिसरातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच गेवराईचे पोलीस व नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मध्यरात्री उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात आली.