औरंगाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या तरुणाने प्रेमप्रकरणातून स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेत तरुणीला कवेत घेतले. यामध्ये दोघेही भाजले असून तरुणाची प्रकृती गंभीर आहे. गजानन खुशालराव मुंडे, असे त्याचे नाव असल्याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. भाजलेला गजानन व तरुणी दोघेही प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी. करत होते, अशी माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली. या दोघांवरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीबी का मकबराच्या मागील बाजूच्या शासकीय विज्ञान संस्थेच्या परिसरात असलेल्या फाॅरेन्सिक विभागात गजानन सोमवारी दुपारी २ च्या सुमारास गेला. तेव्हा तरुणीने त्याला पाहिले आणि त्याच्याजवळ बाटलीत ज्वलनशील पदार्थ असल्याचा अंदाज बांधला. यावेळी तेथे असलेल्या एका ज्येष्ठ प्राध्यापिकेने तरुणीला सावध केले. गजाननने आधी स्वत:वर पेट्रोल ओतले व नंतर भीतीने पळत असलेल्या तरुणीला पकडले. त्याने तिच्यावरही पेट्रोल ओतले. तरुणीने त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर हातून निसटेल म्हणून गजाननने तरुणीला कवेत घेत लायटरने स्वत:सह तिलाही पेटवले. त्यानंतर पुन्हा तरुणीने सुटका करून घेतली. मात्र, तोपर्यंत तीही चांगलीच भाजली होती. या दोघांनाही घाटीमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, भंडारे आदींसह अनेक पोलीस दाखल झाले होते.

Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र
After the suspension Vice-Chancellor Dr Subhash Chaudhary took charge of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
नागपूर: निलंबनानंतर कुलगुरू डॉ. चौधरींनी पदभार स्वीकारला
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

अल्पभूधारक एका शेतकऱ्याचा मुलगा असलेला गजानन मुंडे हा जिंतूर तालुक्यातील दाभा (डिग्रस) या गावचा रहिवासी असून चार वर्षांपासून तो येथे पीएच.डी. करत होता. तो नेट-सेट उत्तीर्णही होता. पीडित तरुणीही पीएच.डी. करत आहे. ती सिडकोतील एन-७ भागातील रहिवासी आहे. या दोघांनी औंढ्यातील एका मंदिरात विवाह केला होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांना त्यांचा विवाह मान्य नव्हता. त्यातूनच तरुणीच्या कुटुंबीयांनी गजाननविरोधात सिडको पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी त्याला समजही दिल्याची माहिती त्याच्या काही निकटवर्तीयांकडून मिळाली. तर तरुणीनेही बेगमपुरा पोलीस ठाण्यात गजाननविरोधात अर्ज दिला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.